Rules & privacy

नियम व गोपनीयता

The Parent's Declaration from the admission form, and how we use the details you give us.

प्रवेश अर्जावरील पालकांचे प्रतिज्ञापत्र आणि आपण दिलेल्या माहितीचा आम्ही कसा वापर करतो.

Parent's Declaration

पालकांचे प्रतिज्ञापत्र

The parent or guardian accepts these points by signing the Parent's Declaration on the admission form. The text below is from the 2026-27 brochure.

प्रवेश अर्जावरील पालकांच्या प्रतिज्ञापत्रावर सही करून पालक खालील बाबी मान्य करतात. हा मजकूर 2026-27 च्या माहितीपत्रकातील आहे.

✓I accept the following terms on behalf of my child through the Excellent Olympiad Examination application form.
एक्सलंट ऑलिम्पियाड परीक्षा आवेदन पत्राच्या माध्यमातून मी खालील बाबी मान्य करत आहे.

✓I am enrolling my child in the Excellent Olympiad Examination a private examination of my own free will.
मी माझ्या पाल्याचा प्रवेश एक्सलंट ऑलिम्पियाड परीक्षा या खाजगी परीक्षेसाठी स्वखुशीने घेत आहे.

✓I firmly believe that through this examination, my child will gain preparation experience for various types of competitive examinations.
या परीक्षेच्या माध्यमातून माझ्या पाल्याची विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी होईल, असा माझा ठाम विश्वास आहे.

✓All responsibility for my child's safety regarding this examination or any other exam-related matters rests with me. (Such as purchasing reading material, travel expenses, etc.)
या परीक्षेबाबत माझ्या पाल्याची सुरक्षितता अथवा इतर परीक्षा विषयक बाबींची सर्व जबाबदारी माझी असेल. (परीक्षे संदर्भात अवांतर वाचन साहित्य खरेदी, परीक्षेसाठी करावा लागणारा प्रवास इ.)

✓I am fully aware that the Excellent Olympiad Examination is a supplement to my child's school curriculum and will not put any additional pressure on my child's studies.
एक्सलंट ऑलिम्पियाड परीक्षा ही माझ्या पाल्याच्या शालेय अभ्यासक्रमास पूरक असल्यामुळे माझ्या पाल्यावर परीक्षेच्या अभ्यासाचा कोणताही अतिरिक्त ताण पडणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे.

✓Since this examination is based on the school curriculum, there is no need to purchase additional educational material for it, and it will not add to the family's financial burden – I am aware of this.
ही परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर असल्यामुळे त्याला इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची आवश्यकता नाही व त्यामुळे त्याच्या शालेय दप्तराच्या वजनात वाढ होणार नाही ही गोष्ट मला ज्ञात आहे.

✓If I have purchased some material for extra preparation, I believe it is necessary for my child's educational progress and I have done so myself. I accept that the examination and the material purchase have no connection whatsoever.
परीक्षेच्या अधिक तयारीसाठी जर मी काही साहित्य खरेदी केले तर ते माझ्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक आहे असे मला वाटते म्हणून मी ते खरेदी करू शकतो. वरील उल्लेखित परीक्षेचा व साहित्य खरेदीचा कुठलाही संबंध नाही असे मी मान्य करत आहे.

✓I know that this examination organised by Excellent Olympiad Foundation is fully private, that no government body is affiliated with it in any way, and that the examination schedule fixed by the management – whether advanced or changed – is binding on me.
एक्सलंट ऑलिम्पियाड फाऊंडेशन द्वारे आयोजित ही परीक्षा पूर्णपणे खाजगी आहे, शिक्षण व्यवस्थेशी निगडीत कोणत्याही शासकीय घटकाचा एक्सलंट ऑलिम्पियाड परीक्षेशी कोणताही संबंध नाही हे मी जाणतो व परीक्षा व्यवस्थापनाने वेळोवेळी ठरविलेले किंवा बदललेले परीक्षेशी निगडीत नियोजन मला बंधनकारक आहे.

✓I know that the Excellent Olympiad Examination is organised on a “no profit, no loss” basis.
एक्सलंट ऑलिम्पियाड परीक्षा ही ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर आयोजित केली जाते, हे मला ज्ञात आहे.

✓I know that Excellent Olympiad Foundation does not guarantee academic ability or quality of any student. Therefore, the organisation declines responsibility for any mental pressure on students. Parents should note this carefully.
एक्सलंट ऑलिम्पियाड फाऊंडेशन कोणत्याही पद्धतीने परीक्षा प्रविष्ठ विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता अथवा गुणवत्ता निश्चित करत नाही. यामुळे परीक्षा संदर्भातील परीक्षार्थीवर येणाऱ्या कोणत्याही मानसिक दबावाची जबाबदारी संस्था नाकारत आहे. याची पालकांनी गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.

✓All rights regarding the examination are reserved by Excellent Olympiad Foundation.
परीक्षेबाबतचे सर्व हक्क एक्सलंट ऑलिम्पियाड फाऊंडेशन कडे राखून आहेत.

✓I know that all legal matters related to the examination are within the jurisdiction of the District Court, Pune.
परीक्षे संदर्भातील सर्व कायदेशीर बाबी ‘जिल्हा न्यायालय पुणे’ यांच्या कक्षेत असतील, हे मला ज्ञात आहे.

How we use your details

आपल्या माहितीचा वापर

✓What the admission form asks for. Student: name, class, medium, mother's name, date of birth, WhatsApp number and email. School: name, address, contact number and email, and the teacher's name and WhatsApp numbers. Parent or guardian: name and address. These fields are printed on the form.
प्रवेश अर्जात भरायची माहिती: विद्यार्थी: नाव, इयत्ता, माध्यम, आईचे नाव, जन्मतारीख, WhatsApp क्रमांक व ईमेल. शाळा: नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व ईमेल, तसेच शिक्षकाचे नाव व WhatsApp क्रमांक. पालक: नाव व पत्ता. हे रकाने अर्जावर छापलेले आहेत.

✓Why we ask for it. To register the student, run the exam, publish results and answer keys, give prizes and certificates, and contact parents and schools about the exam.
ही माहिती कशासाठी: विद्यार्थ्याची नोंदणी करणे, परीक्षा घेणे, निकाल व उत्तरसूची प्रसिद्ध करणे, पारितोषिके व प्रमाणपत्रे देणे आणि परीक्षेबाबत पालक व शाळांशी संपर्क साधणे.

✓What is published. Results are checked with the Student ID. Selection lists and prize-winner lists may show the student's name, class and school.
काय प्रसिद्ध होते: निकाल विद्यार्थी आयडी (Student ID) वापरून पाहिला जातो. निवड यादी व पारितोषिक विजेत्यांच्या यादीत विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता व शाळा दिसू शकते.

✓Questions or corrections. Contact us on WhatsApp 98 5000 50 22 or email [email protected].
प्रश्न किंवा दुरुस्ती: WhatsApp 98 5000 50 22 वर किंवा [email protected] वर ईमेलने आमच्याशी संपर्क साधा.

Last updated: 26 October 2026 · अद्ययावत: 26 ऑक्टोबर 2026

Contact us
Scroll to Top